छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) प्रभाग क्रमांक २३ वार्ड क्रमांक ८१ मधील जुनी एस. टी. कॉलनी, विवेक हौसिंग सोसायटी, महाजन कॉलनी, संपूर्ण प्रबोधनकार ठाकरेनगर, माया नगर, विनय कॉलनी, आदर्श कॉलनी आदी वसाहतींमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास मनसे आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा संघटन अशोक पवार यांनी दिला आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे रहिवासी यांना पोटाचे आजार, गॅस्ट्रोची, मूतखडा सारख्या गंभीर आजाराची लागण होत आहे. पाणी माफिया गुंडगिरी करून साधारण नागरिकांचा आवाज दाबून टाकतात. कंत्राटदार वाटेल तिथे खोदायला सुरुवात करत. यामुळे ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा लाईन फुटून घाण ड्रेनेजचे पाणी नवीन टाकलेल्या पाणी पुरवठा मेन लाईनमध्ये जाते. स्वच्छ पाण्याचा सुरळीत पाणी पुरवठा करून चोर पाणी माफिया गुंडांना आवर घालावा नसता नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा मनसे जिल्हा
संघटक अशोक पवार पाटील, उपजिल्हा संघटक अशोक कराळे पाटील तालुका सचिव बाबासाहेब बोजवारे पाटील, अशोक भंनगे पाटील, मुकेश मालोदे पाटील, विठ्ठल बनकर, अशोक आंबूलगेकर, रमाकांत निकम पाटील, शरद बनकर, विशाल कवडे, प्रमोद कुंटे, सोमेश्वर महामुने आदींनी दिला आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












